Sunday, October 28, 2012

पुणे बस डे आणि काही प्रश्न!

गेले काही दिवस पुणे बस डे  या उपक्रमाची जाहिरात पुण्यात जोरात चालू आहे. हा उपक्रम म्हणजे काय तर एक नोव्हेंबर ला पुणेकरांनी बस वापरावी. खरेतर या गोष्टीला माझीसुद्धा काहीच हरकत नाही, किंबहुना सक्रीय पाठींबाच आहे पण... आणि हा पण मला खूप सलतोय. 
पण का???

१. मी एक दिवस बस ने प्रवास का करावा?
पुण्याचा प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी? अर्थात एका दिवसाचा बस प्रवास हे केवळ प्रतीकात्मक आहे हे  बहुतेकांना माहित असतंच. आणि हा प्रवास म्हणजे एखादी गोष्ट योग्य आहे हे आपल्या आयुष्यात पुन्हा ठसवण्याचा एक चांगला प्रयत्न राहील.
पण एखाद्याला खरच वाटलं, कि नाही बा, मला रोजच बसने प्रवास करायचाय, तर तशी व्यवस्था पुण्यात आहे का? मी धनकवडीला राहतो आणि त्यामुळे निदान (इथून निघताना तरी) बसचा शेवटचा थांबा असल्यामुळे मला बसमध्ये उभे राहण्यासाठी जागा मिळण्याची खात्री आहे. पण परत येताना? ५ नंतर घरी बसने येणाऱ्या धनकवडीकरांना विचारा. बाजारात विकायला आणलेली गुरेढोरे यापेक्षा चांगला प्रवास करतात. कित्येक बस मध्ये उभे राहायलाहि जागा नसते म्हणून त्या सोडून द्याव्या लागतात. पायाची काही बोटे त्या फूट रेस्ट वर ठेवून दप्तरासकट सगळे शरीर त्या बसच्या बाहेर, अशा अवस्थेत प्रवास करणारे विद्यार्थी तुम्हाला दिसत नाहीत का? ५ कि.मी. साठी १० रुपये देऊन कसेबसे उभे राहून एखाद्याने का यावे? केवळ तो गाडी घेऊ शकत नाही म्हणून? अरे स्वत:च्या गाडीने ७ रुपयात हे अंतर कापता येतं आणि तेही सुखाने.

म्हणजे तुम्ही प्रवास सुखाचा होईल यासाठी काही करणार नाही, तो कमी पैशात होईल यासाठी काही करणार नाही, आणि म्हणे बसने प्रवास करा!!!  अरे आधी जे बसने रोज प्रवास करतात त्यांना जरी बरी सेवा द्या. लय अपेकशा नाय आमची. निदान उभे राहायला जागा द्या. वेळेवर बस सोडा.
मला अनेक मुंबईकर ओळखीचे आहेत. त्यांच्यापैकी नाही कोणी गाडी वापरत कामावर जायला. याची कारणे शोधायला पी.एच.डी. लागते का? साधी गोष्ट आहे... तुम्ही व्यवस्था चांगली करा, लोक आपोआप ती व्यवस्था वापरतील.




२. बरं, मुळ प्रश्न काय आहे? प्रदूषण कि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था? लोकांनी जर सार्वजनिक वाहने वापरावी असे वाटत असेल तर स्थानीक स्वराज्य संस्थांनी या व्यवस्था सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसे ते होत आहेत का ?
गाड्यांची अवस्था काय आहे? ब्रेक डाउन, ब्रेक फेल, क्लच फेल अशा अवस्थेतल्या गाड्यासुद्धा आमचे पी.एम.टी. मधले ड्रायवर ओफ्फिस टाईममध्ये केवळ प्रवाशांच्या सोयीसाठी अनेकदा शेवटपर्यंत नेतात. पण हि वेळ का यावी? पी.एम.टी., बी.आर.टी. हि नेत्यांच्या खाण्याची कुरणे असतील तर त्याविरोधात वर्तमानपत्रे का आघाडी उघडत नाहीत?
पुण्याची गोष्ट घेतली तर, २००७ च्या जाहीरनाम्यात ली मेट्रो पुन्हा २०१२ च्या जाहीरनाम्यात का दिसते? आणि बहुतेक २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा ती मेट्रो  दिसेल!
का पवारसाहेबांना कुणी विचारात नाही कि लवासाची वकिली करायला सरसावणारे, या मेट्रो साठी का पुढाकार घेत नाहीत?
पी.एम.टी. च्या आजच्या अवस्थेला जबाबदार कोण? आणि पी.एम.टी.च का? ठाणे किंवा कोल्हापूर चाही अनुभव  काही खास उत्साहवर्धक नाही.

३. या शहरात लाखो दुचाकी वाहने आणि हजारो रिक्षा सहज खपतात, आणि हेच लोक अशा उपकमांनासुद्धा  पाठींबा देतात याचा अर्थ काय? मला असा वाटतं कि याचा अर्थ म्हणजे लोक सांगताहेत कि आम्ही सार्वजनिक वाहनातून प्रवास करायला स्वत:हून उत्सुक आहोत, पण आज अशी व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने या गाड्या, रिक्षा वापराव्या लागताहेत. पण या (प्रखर, विदारक, दुर्दैवी) वास्तवाकडे कोण लक्ष देणार?
शेवटी एवढेच वाटते कि, आम्हा पुणेकरांना इवेन्ट आवडतात. गणपती झाले, गरबा झाला आणि आता पुणे  बस डे!

Sunday, June 13, 2010

एकाच या जन्मी जणू

एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे,
जातील सार्‍या लयाला प्रथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे,
नाही उदासी ना व्यथा
ना बंधने नाही गुलामी,
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या,
फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी,
या वाहणार्‍या गाण्यातूनी
लहरेन मी, बहरेन मी
क्षितीजातूनी उगवेन मी
गीतकार :सुधीर मोघे
गायिका :आशा भोसले
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :पुढ़चं पाऊल

Tuesday, May 25, 2010

मन मनास उमगत नाही

ऐकलेल्या कविता कधी उमगतील याचा नेम नाही...
अशीच एक कविता आज share करतोय.

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा
मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन ऩक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले
मन रानभूल मन चकवा
मन काळोखाची गुंफ़ा मन तेजाचे राऊळ
मन सॆतानाचा हात मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा
चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही याच्याविण दुसरा नाही
या अनोळ्खी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा ?
 गीत – सुधीर मोघे
संगीत – श्रीधर फडके
स्वर – श्रीधर फडके

त्याला इलाज नाही

धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

-विंदा करंदीकर 

Sunday, May 9, 2010

एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदीकर

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।

श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥

Monday, May 3, 2010

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा

तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा

घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा

तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरीता सागरा

कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परी ना वळते
हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा

घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा
 
 
गायक :सुधीर फडकेचित्रपट :आराम हराम है

माना जनाब ने पुकारा नहीं

(माना जनाब ने पुकारा नहीं
क्या मेरा साथ भी गवारा नहीं
मुफ़्त में बन के, चल दिये तनके, 
वल्ला जवाब तुम्हारा नहीं ) \- २
माना जनाब ने ...

(यारों का चलन है गुलामी
देतें हैं हसीनों को सलामी ) \- २
गुस्सा ना कीजिये जाने भी दीजिये
बन्दगी तो बन्दगी तो लीजिये साहब
माना जनाब ने ...

(टूटा फूटा दिल ये हमारा,
जैसा भी है अब है तुम्हारा ) \- २
इधर देखिये, नज़र फेरिये  
दिल्लगी ना दिल्लगी ना कीजिये साहब
माना जनाब ने ...

(माशा अल्ला कहना तो माना
बन गया बिगड़ा ज़माना ) \- २
तुमको हँसा दिया, प्यार सिखा दिया \- २
शुक्रिया तो शुक्रिया तो कीजिये साहब
माना जनाब ने पुकारा नहीं,
क्या मेरा साथ भी गवारा नहीं
मुफ़्त में बन के, चल दिये तनके, 
वल्ला जवाब तुम्हारा नहीं हाय \- ३