लहान्पनी माज्या शाळेत प्रशांत वडनेरे नावाचा एक मुलगा होता। आमची शाळेत जुजबी ओळख होती। पुढे बारावी नंतर तो B.Sc Agri ला गेला। पुढे कधी त्याची भेट झाली नाही पण काल त्याच्याबद्दलची ही बातमी ऐकली आनी उर अभीमनाने भरून आला। अभिमान या गोष्टीचा की आमच्या शालेच्या कुणीतरी विद्यार्थी आयुष्यावर आपला ठसा उमतावतोय । पण त्याही पेक्षा जास्त कौतुक आहे त्याच्या जीद्दीचा अणी धैर्याचा... घराची जबाबदारी घेनार्या आनी मूलाच्या पाठीमागे खाम्बीर पणे उभे राह्नार्या त्याच्या आईचा... तेव्हा या दोघांनाही हा मनाचा मुजरा ...
खालील बातमी सकाल च्या १७ मे च्या अंकात आलेली आहे।
मुलगा "आयएएस' झाला आईच्या कष्टाचे चीज झाले
पुणे, ता. १६ - घरातील कर्ता माणूस कायम आजारी असल्याने गावाकडे चला, असा नातेवाइकांचा आग्रह, मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी त्या पुण्यातच राहिल्या.
पाच वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. तरीही धीर न सोडता कपड्याच्या दुकानात काम करून मुलांना शिकवले. त्या कष्टाचे आज चीज झाले. मुलगा "आयएएस' झाला. मुलाच्या यशाने त्या माऊलीला गगन ठेंगणे झाले.
प्रशांत मुकुंद वडनेरे हे त्या मुलाचे नाव. "युपीएससी' परीक्षेत देशात प्रशांत ६२ वा आला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत प्रशांतने मिळविलेले यश त्याच्या आईला सर्वाधिक समाधान देणारे ठरले आहे. प्रशांत सुरवातीपासून हुशार होता. शाळेत असतानाच "आयएएस' होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याच्या कष्टाला मी मदत केली इतकेच अशी भावना प्रशांतच्या आई सुनंदा वडनेरे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ""प्रामाणिकपणे कष्ट केल्यानंतर यश नक्की मिळते याचा प्रत्यय आज आला. यशस्वी होण्याची प्रामाणिक इच्छा आणि त्यासाठी करावी लागणारी मेहनत यामुळे प्रशांतला यश मिळाले आहे.''
प्रशांत म्हणाला, ""पुण्यातून बीएस्सी (कृषी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मुंबईत "एसआयएसी'मध्ये सहा महिने तयारी केली. त्यानंतर पुण्यातच ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास करीत तेथेच समन्वयक म्हणून काम केले. रोज दहा ते बारा तास अभ्यास केला.''
यश आईचे!
परीक्षा मी उत्तीर्ण झालो तरी हे यश आईचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांतने व्यक्त केली. तो म्हणाला, ""आईच्या जिद्दीमुळे मी शिक्षण घेऊन शकलो. मी लहान असतानापासून वडील आजारी असायचे. पाच वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. शेवटपर्यंत आईच त्यांचा आधार होती. त्यानंतर माझे आणि दोन लहान भावंडांचे शिक्षण आईने केले. त्यासाठी अनेक ठिकाणी नोकरी केली. अभ्यासासाठी प्रबोधिनीत आलो आणि माझे सोने झाले.
One flew Over the Cuckoos Nest
13 years ago