Sunday, January 1, 2017

हिंदुत्व



मी नववर्षाच्या शुभेच्छा देईन,
१ जानेवारीला, पाडव्याला,
आणि सुट्टी मिळाली तर पतेती ला पण.
मी व्हॅलेन्टाईन डे साजरा करीन.
झालच तर मदर्स डे आणि फादर्स डे पण.
मी ख्रिसमस ला केक आणीन,
आणि बकरी ईद ला मटण.
पण नाही पाळणार मार्गशीर्ष किंवा श्रावण.
शिवरात्रीला ठंडाई घेईन,
आणि नवरात्रात मासे खाईन.
साडे तीन मुहुर्तांचे साडे तीन पेग घेईन.
पोर्क खाईन, बीफ खाईन,
शेण खाईन आणि तोंड काळे करीन.
मी देवळात जाणार नाही आणि
मूर्तीला नमस्कार करणार नाही.

आहारापासून मैथुनापर्यंत प्रत्येक
ठिकाणी लुडबुडणाऱ्या धर्म मार्तंडानी
हे जग घडवलेले नाही.

हिंदू म्हणून मी जन्माला आलो असेन,
पण केवळ एक हिंदू
हीच माझी ओळख ठरणार नाही.