गेले काही दिवस पुणे बस डे या उपक्रमाची जाहिरात पुण्यात जोरात चालू आहे. हा उपक्रम म्हणजे काय तर एक नोव्हेंबर ला पुणेकरांनी बस वापरावी. खरेतर या गोष्टीला माझीसुद्धा काहीच हरकत नाही, किंबहुना सक्रीय पाठींबाच आहे पण... आणि हा पण मला खूप सलतोय.
पण एखाद्याला खरच वाटलं, कि नाही बा, मला रोजच बसने प्रवास करायचाय, तर तशी व्यवस्था पुण्यात आहे का? मी धनकवडीला राहतो आणि त्यामुळे निदान (इथून निघताना तरी) बसचा शेवटचा थांबा असल्यामुळे मला बसमध्ये उभे राहण्यासाठी जागा मिळण्याची खात्री आहे. पण परत येताना? ५ नंतर घरी बसने येणाऱ्या धनकवडीकरांना विचारा. बाजारात विकायला आणलेली गुरेढोरे यापेक्षा चांगला प्रवास करतात. कित्येक बस मध्ये उभे राहायलाहि जागा नसते म्हणून त्या सोडून द्याव्या लागतात. पायाची काही बोटे त्या फूट रेस्ट वर ठेवून दप्तरासकट सगळे शरीर त्या बसच्या बाहेर, अशा अवस्थेत प्रवास करणारे विद्यार्थी तुम्हाला दिसत नाहीत का? ५ कि.मी. साठी १० रुपये देऊन कसेबसे उभे राहून एखाद्याने का यावे? केवळ तो गाडी घेऊ शकत नाही म्हणून? अरे स्वत:च्या गाडीने ७ रुपयात हे अंतर कापता येतं आणि तेही सुखाने.
म्हणजे तुम्ही प्रवास सुखाचा होईल यासाठी काही करणार नाही, तो कमी पैशात होईल यासाठी काही करणार नाही, आणि म्हणे बसने प्रवास करा!!! अरे आधी जे बसने रोज प्रवास करतात त्यांना जरी बरी सेवा द्या. लय अपेकशा नाय आमची. निदान उभे राहायला जागा द्या. वेळेवर बस सोडा.
मला अनेक मुंबईकर ओळखीचे आहेत. त्यांच्यापैकी नाही कोणी गाडी वापरत कामावर जायला. याची कारणे शोधायला पी.एच.डी. लागते का? साधी गोष्ट आहे... तुम्ही व्यवस्था चांगली करा, लोक आपोआप ती व्यवस्था वापरतील.
२. बरं, मुळ प्रश्न काय आहे? प्रदूषण कि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था? लोकांनी जर सार्वजनिक वाहने वापरावी असे वाटत असेल तर स्थानीक स्वराज्य संस्थांनी या व्यवस्था सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसे ते होत आहेत का ?
गाड्यांची अवस्था काय आहे? ब्रेक डाउन, ब्रेक फेल, क्लच फेल अशा अवस्थेतल्या गाड्यासुद्धा आमचे पी.एम.टी. मधले ड्रायवर ओफ्फिस टाईममध्ये केवळ प्रवाशांच्या सोयीसाठी अनेकदा शेवटपर्यंत नेतात. पण हि वेळ का यावी? पी.एम.टी., बी.आर.टी. हि नेत्यांच्या खाण्याची कुरणे असतील तर त्याविरोधात वर्तमानपत्रे का आघाडी उघडत नाहीत?
पुण्याची गोष्ट घेतली तर, २००७ च्या जाहीरनाम्यात ली मेट्रो पुन्हा २०१२ च्या जाहीरनाम्यात का दिसते? आणि बहुतेक २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा ती मेट्रो दिसेल!
का पवारसाहेबांना कुणी विचारात नाही कि लवासाची वकिली करायला सरसावणारे, या मेट्रो साठी का पुढाकार घेत नाहीत?
पी.एम.टी. च्या आजच्या अवस्थेला जबाबदार कोण? आणि पी.एम.टी.च का? ठाणे किंवा कोल्हापूर चाही अनुभव काही खास उत्साहवर्धक नाही.
३. या शहरात लाखो दुचाकी वाहने आणि हजारो रिक्षा सहज खपतात, आणि हेच लोक अशा उपकमांनासुद्धा पाठींबा देतात याचा अर्थ काय? मला असा वाटतं कि याचा अर्थ म्हणजे लोक सांगताहेत कि आम्ही सार्वजनिक वाहनातून प्रवास करायला स्वत:हून उत्सुक आहोत, पण आज अशी व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने या गाड्या, रिक्षा वापराव्या लागताहेत. पण या (प्रखर, विदारक, दुर्दैवी) वास्तवाकडे कोण लक्ष देणार?
शेवटी एवढेच वाटते कि, आम्हा पुणेकरांना इवेन्ट आवडतात. गणपती झाले, गरबा झाला आणि आता पुणे बस डे!
पण का???
१. मी एक दिवस बस ने प्रवास का करावा?
पुण्याचा प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी? अर्थात एका दिवसाचा बस प्रवास हे केवळ प्रतीकात्मक आहे हे बहुतेकांना माहित असतंच. आणि हा प्रवास म्हणजे एखादी गोष्ट योग्य आहे हे आपल्या आयुष्यात पुन्हा ठसवण्याचा एक चांगला प्रयत्न राहील.पण एखाद्याला खरच वाटलं, कि नाही बा, मला रोजच बसने प्रवास करायचाय, तर तशी व्यवस्था पुण्यात आहे का? मी धनकवडीला राहतो आणि त्यामुळे निदान (इथून निघताना तरी) बसचा शेवटचा थांबा असल्यामुळे मला बसमध्ये उभे राहण्यासाठी जागा मिळण्याची खात्री आहे. पण परत येताना? ५ नंतर घरी बसने येणाऱ्या धनकवडीकरांना विचारा. बाजारात विकायला आणलेली गुरेढोरे यापेक्षा चांगला प्रवास करतात. कित्येक बस मध्ये उभे राहायलाहि जागा नसते म्हणून त्या सोडून द्याव्या लागतात. पायाची काही बोटे त्या फूट रेस्ट वर ठेवून दप्तरासकट सगळे शरीर त्या बसच्या बाहेर, अशा अवस्थेत प्रवास करणारे विद्यार्थी तुम्हाला दिसत नाहीत का? ५ कि.मी. साठी १० रुपये देऊन कसेबसे उभे राहून एखाद्याने का यावे? केवळ तो गाडी घेऊ शकत नाही म्हणून? अरे स्वत:च्या गाडीने ७ रुपयात हे अंतर कापता येतं आणि तेही सुखाने.
म्हणजे तुम्ही प्रवास सुखाचा होईल यासाठी काही करणार नाही, तो कमी पैशात होईल यासाठी काही करणार नाही, आणि म्हणे बसने प्रवास करा!!! अरे आधी जे बसने रोज प्रवास करतात त्यांना जरी बरी सेवा द्या. लय अपेकशा नाय आमची. निदान उभे राहायला जागा द्या. वेळेवर बस सोडा.
मला अनेक मुंबईकर ओळखीचे आहेत. त्यांच्यापैकी नाही कोणी गाडी वापरत कामावर जायला. याची कारणे शोधायला पी.एच.डी. लागते का? साधी गोष्ट आहे... तुम्ही व्यवस्था चांगली करा, लोक आपोआप ती व्यवस्था वापरतील.
२. बरं, मुळ प्रश्न काय आहे? प्रदूषण कि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था? लोकांनी जर सार्वजनिक वाहने वापरावी असे वाटत असेल तर स्थानीक स्वराज्य संस्थांनी या व्यवस्था सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसे ते होत आहेत का ?
गाड्यांची अवस्था काय आहे? ब्रेक डाउन, ब्रेक फेल, क्लच फेल अशा अवस्थेतल्या गाड्यासुद्धा आमचे पी.एम.टी. मधले ड्रायवर ओफ्फिस टाईममध्ये केवळ प्रवाशांच्या सोयीसाठी अनेकदा शेवटपर्यंत नेतात. पण हि वेळ का यावी? पी.एम.टी., बी.आर.टी. हि नेत्यांच्या खाण्याची कुरणे असतील तर त्याविरोधात वर्तमानपत्रे का आघाडी उघडत नाहीत?
पुण्याची गोष्ट घेतली तर, २००७ च्या जाहीरनाम्यात ली मेट्रो पुन्हा २०१२ च्या जाहीरनाम्यात का दिसते? आणि बहुतेक २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा ती मेट्रो दिसेल!
का पवारसाहेबांना कुणी विचारात नाही कि लवासाची वकिली करायला सरसावणारे, या मेट्रो साठी का पुढाकार घेत नाहीत?
पी.एम.टी. च्या आजच्या अवस्थेला जबाबदार कोण? आणि पी.एम.टी.च का? ठाणे किंवा कोल्हापूर चाही अनुभव काही खास उत्साहवर्धक नाही.
३. या शहरात लाखो दुचाकी वाहने आणि हजारो रिक्षा सहज खपतात, आणि हेच लोक अशा उपकमांनासुद्धा पाठींबा देतात याचा अर्थ काय? मला असा वाटतं कि याचा अर्थ म्हणजे लोक सांगताहेत कि आम्ही सार्वजनिक वाहनातून प्रवास करायला स्वत:हून उत्सुक आहोत, पण आज अशी व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने या गाड्या, रिक्षा वापराव्या लागताहेत. पण या (प्रखर, विदारक, दुर्दैवी) वास्तवाकडे कोण लक्ष देणार?
शेवटी एवढेच वाटते कि, आम्हा पुणेकरांना इवेन्ट आवडतात. गणपती झाले, गरबा झाला आणि आता पुणे बस डे!
No comments:
Post a Comment