Tuesday, May 25, 2010

मन मनास उमगत नाही

ऐकलेल्या कविता कधी उमगतील याचा नेम नाही...
अशीच एक कविता आज share करतोय.

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा
मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन ऩक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले
मन रानभूल मन चकवा
मन काळोखाची गुंफ़ा मन तेजाचे राऊळ
मन सॆतानाचा हात मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा
चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही याच्याविण दुसरा नाही
या अनोळ्खी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा ?
 गीत – सुधीर मोघे
संगीत – श्रीधर फडके
स्वर – श्रीधर फडके

No comments: